-->
आपला महाराष्ट्र 24

२०२३ वर्ल्ड तायक्वॉन्डो प्रेसिडेंट कप, ओशनिया पॅरा व ऑस्ट्रेलियन ओपनतायक्वोंन्डो स्पर्धेसाठी सुभाष पाटील यांची पंचपदी निवड.



उरण (सुनिल ठाकूर ).
 सिटी ऑफ मोरायफिल्ड, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया येथे ७ जुलै ते १० जुलै २०२३ या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड तायक्वॉन्डो प्रेसिडेंट कप, ओशनिया पॅरा व ऑस्ट्रेलियन ओपन तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी पंच म्हणून भारतातून एकमेव आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तसेच कॉमनवेल्थ तायक्वॉन्डो युनियनचे सदस्य सुभाष पाटील यांची निवड झाली आहे.
सुभाष पाटील हे सातवी डिग्री ब्लॅक बेल्ट व आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्या आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युनिअर तायक्वॉन्डो स्पर्धा दक्षिण कोरिया २००४ भारतीय संघाचे कोच, पंच पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०१० भारत, पंच कॉमनवेल्थ स्पर्धा २०११ भारत, आंतरराष्ट्रीय तायक्वॉन्डो स्पर्धा दक्षिण कोरिया २०११ भारतीय संघाचे कोच, पंच ११वी इजराइल ओपन तायक्वॉन्डो स्पर्धा २०१३, पंच ८ वी स्कॉटिश ओपन स्पर्धा २०१३ स्कॉटलंड, संघप्रमुख कोरिया ओपन २०१४ आंतरराष्ट्रीय साफ गेम २०१६, लुसोफोतीया तायक्वॉन्डो स्पर्धा नियंत्रक २०१४ गोवा, कॅनडा ओपन व पॅरा ओपन
 तायक्वॉन्डो चॅम्पियनशिप २०१७ तसेच २०१८ ते २०२२ पर्यंत अनेक पंच प्रशिक्षण व स्पर्धामध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सुभाष पाटील हे सतत तायक्वॉन्डो अंतरराष्ट्रीय पंच परीक्षा सेमिनार प्रशिक्षण
यात सहभागी होऊन तायक्वॉन्डो मधील नवीन नियम अनुभव शिकत असतात. या सेमिनार प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा फायदा जास्तीत जास्त खेळाडूंन पर्यंत पोहोचण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्याकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक पदके मिळवले आहेत. भविष्यात अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊन भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर भूषवतील असे सुभाष पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी सुभाष पाटील हे ४ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया येथे रवाना झाले आहेत. त्यांना या स्पर्धेसाठी तायक्वॉडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रायगड तायक्वॉन्डो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.