-->
आपला महाराष्ट्र 24

रायगडचे पालकमंत्री शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेच असावेत : उरण शिवसेनेचे संघटक कृष्णा पाटील यांची मागणी




 उरण (सुनिल ठाकूर ).
- रायगडचे पालकमंत्री शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेच असावेत अशी मागणी उरण शिवसेनेचे संघटक कृष्णा पाटील यांनी केली आहे.
कृष्णा पाटील यांनी केलेल्या मागणी पत्रकामध्ये, रायगड जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता आत्तापर्यंतच्या सर्व राजकीय घडामोडी पाहता शिवसेनेच्या आमदारांच मोठं योगदान आहे.नवीन सरकार स्थापन करण्यात या आमदारांनी स्वतःची आहुती दिली आहे.कशाचीही पर्वा केलेली नाही.आमदार भरत गोगावले सातत्याने तीन वेळा त्यांच्या  मतदारसंघात  ते निवडून आलेले आहेत.रायगडच्या विकासाचा  त्यांच्या ठायी आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व प्रति त्यांची मोठी निष्ठा आहे. आणि रायगडच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. रायगडचा विकास करण्याची त्यांच्यात धमक आहे.संपूर्ण रायगड करांना ते परिचित आहेत. आपलेसे वाटतात.राजकीय दृष्ट्या शिवसेना भाजपचे आमदार आहेत.नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीचा त्याच्यात जास्त न विचार करता जन्मताच आदर करून रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेच असावेत अशी आग्रहाची मागणी वजा विनंती करणारे पत्रक उरण विधानसभा मतदारसंघातर्फे शिवसेनेचे संघटक कृष्णा पाटील यांनी दिली आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.