उरण (सुनिल ठाकूर ) - स्वामी समर्थ महाराजांच्या वर हा सिनेमा भक्तिमय असला तरी तितकाच सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून संदेश देणारा आहे. तसेच आजच्या तरुणाईला स्वामी मार्ग दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक अभिषेक निकम यांनी केला आहे. स्वामी आजोबा बहुचर्चित सिनेमाची स्वामी भक्त आतुरतेने वाट पाहत होते.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांवर वेगवेगळ्या प्रचीतींवर आत्तापर्यंत अक्कलकोट महाराज फिल्म यांनी "हम गया नही जिंदा है" याचे तीन भाग तयार केले आहेत. ते प्रदर्शित झाले आहेत आणि लाखो लोकांनी ते पाहिले आहेत.
आता "हम गया नही जिंदा है भाग चार *"स्वामी आजोबा"* या दत्त जयंतीला बारा वाजून बारा मिनिटांनी "अक्कलकोट महाराज" यूट्यूब चैनल वर प्रदर्शित होत आहे.
स्वामी समर्थ महाराजांचा 729 वर्षांचा जो कालखंड आहे या कालखंडात महाराजांनी जे कार्य केले किंवा आताही करोडो लोकांना महाराजांची प्रचिती येत आहे. याच लीला जगासमोर आणण्याचे हेतूने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात स्वामींच्या मुख्य भूमिकेत मयुरेश कोटकर हे दिसणार आहेत बाल कलाकार च्या भूमिकेत अपेक्षा खाडे पदार्पण करीत आहे. तसेच ७० हून अधिक प्रसिद्ध कलाकारांनी या मध्ये भुमिका केल्या आहेत. तसेच पडद्यामागील टिमने अतिशय मेहनत या सिनेमासाठी घेतली आहे. या सिनेमाचे लेखन डायलॉग स्क्रीन प्ले व डायरेक्शन अभिषेक वसंत निकम यांनी केले आहे. सिनेमाच शूटिंग भिवंडी, ठाणे, मुंबई आणि पुणे या भागात झाले. हा सिनेमा स्वामी भक्तांसाठी पर्वणी असणार आहे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावा अशी विनंती या टिम ने केली आहे.