उरण (सुनील ठाकूर)- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित दिवा कोळीवाडा केंद्राच्या वतीने गुरुवार दिनांक 1 डिसेंबर ते गुरुवार दिनांक ८ डिसेंबर या कालावधी दरम्यान श्री दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू करण्यात आला आहे. सदर अखंड नामजप यज्ञ सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम त्याचबरोबर आरोग्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ बालसंस्कार सेवा संस्था, दिवा कोळीवाडा केंद्र ऐरोली यांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व कोळी समाज भक्त विश्वस्त मंडळ दिवा कोळीवाडा नवी मुंबई येथे करण्यात आले आहे .
याप्रसंगी साई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यात प्रामुख्याने त्यांनी अध्यात्मिकतेचे महत्त्व पटवून दिले
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग म्हणजे तमाम मानवासाठी अमृत संजीवनी होय. केवळ ज्ञान किंवा तत्त्वज्ञानाने मनुष्य सुखी होत नाही. तर त्याला गरज असते आपल्या धर्माची संस्काराची संस्कृतीची व कृतिशील अध्यात्म्याची. ही गरज ओळखून मानवाला दैनंदिन समस्यांपासून दुःख मुक्त हरवलेली मनशांती पुन्हा मिळून देण्यासाठी ह .भ .प. मोरेदादांनी श्री स्वामी समर्थ मार्गाचा वटवृक्ष दिंडोरी येथे रोवला आणि पप्पू गुरुमाऊली यांनी संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन ठरेल .असे गुरुकुल पीठ श्री शेत्र त्र्यंबकेश्वर येथे निर्माण केले आहे. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून दुःखी अर्त पिडीतांचे दुःख निवारण तेथे होत आहे. यात प्रामुख्याने वास्तुदोष, वास्तु बाधा, मुलांची शिक्षणात प्रगती नाही, मुले हट्टी हेकेखोर आणि आई-वडिलांच्या अज्ञेला न जुमाणारी, घरात पैसा टिकत नाही, पती-पत्नीचे आजारपण, पितृदोष, नोकरी मिळत नाही, धंद्यात यश नाही, संतती नाही, मुला मुलींच्या लग्नात अडथळे येतात अशा विविध समस्यांचे निवारण या सेवा केंद्रामार्फत केले जाते .याशिवाय या सेवा केंद्रात नित्यसेवा म्हणून गुरुचरित्र वाचन, भूपाळी ,आरती, सामुदायिक जप, नैवेद्य ,आरती ,भोजनाचा कार्यक्रम ,विविध ग्रंथांचे पठण, औदुंबर प्रदक्षिणा, आदी सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सप्ताहकाळात मराठी संस्कृती ,,मराठी अस्मिता, बालसंस्कार, देवघर, देव्हारा व गर्भसंस्कार पितृदोष, कुलदैवत, कुलदैवता वास्तुशास्त्र असे मार्गदर्शक कार्यक्रम होतील. तर दरबार विभागात अखंड विणावादन, अखंड स्वामी समर्थ जप ,अखंड श्री स्वामी चरित्र पारायण ,श्री गुरुचरित्र पारायण, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत असे कार्यक्रम होतील .दिनांक 7 डिसेंबर या मुख्यदिवशी श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सत्यदत्त पूजन व सप्ताह सांगता व महानैवद्य व आरती होईल. सध्या या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, सेवा केंद्राचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.