-->
आपला महाराष्ट्र 24

ग्रामपंचायत करंजाडे निवडणुकीसाठी भाजपच्या परिवर्तन पॅनल कडुन उमेदवारी अर्ज दाखल



उरण (सुनिल ठाकूर ).आगामी १८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या परिवर्तन पॅनल कडुन उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. सरपंच पदाचे उमेदवार श्री. मंगेश शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सदस्य पदाकरिता प्रभाग क्रं.१ मधुन श्री. सुरज शेलार, सौ. देवकु वाघे, प्रभाग क्रं.२ मधुन श्री. नंदकुमार भोईर, सौ. प्रीती शहारे, श्री. बिपिन गायकवाड, प्रभाग क्रं.३ मधुन श्री. सागर आंग्रे, सौ. शिल्पा नागे सौ. अनिता भोईर, प्रभाग क्रं.४ मधुन श्री. अतिष साबळे, सौ. अर्चना धामनस्कर व सौ. प्रिया फडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. असंख्य समर्थकांच्या उपस्थितीत मोठी मिरवणूक काढुन करंजाडे ते पनवेल पंचायत समिती असा पायी चालत प्रवास करून पनवेल पंचायत समिती मध्ये सर्व उमेदवरांचे अर्ज भरण्यात आले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.