-->
आपला महाराष्ट्र 24

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण समिती अशासकीय सदस्यपदी राज सदावर्ते यांची निवड

उरण (सुनिल ठाकूर )
 रायगड जिल्हाधिकारी मा. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यासाठी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण दक्षता समिती अशासकीय सदस्य पदी राज सदावर्ते यांची निवड करण्यात आली.शासनाकडून त्यांना नियुक्तीचे पत्र मिळाले. पनवेल चे नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी (महसूल) यांच्या हस्ते त्यांनी ते स्वीकारले.

राज सदावर्ते हे गेली अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते काम करत आहेत, शासनाच्या वेगवेगळ्या समितीवर त्यांनी काम केले आहे, ते उच्चशिक्षित व शांत स्वभावाचे असून शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून राबविल्या आहेत, याचीच दखल घेत त्यांना पनवेल तालुक्याच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण समिती अशासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे अनेक स्तरांकडून कौतुक होत आहे, या समितीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर हे अध्यक्षस्थानी असून आमदार बाळाराम पाटील हे सह अध्यक्ष आहेत, तर एक महिला सदस्य व एक पुरुष सदस्य अशी समिती गटीत करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, वाणिज्य व उद्योग विभाग महाराष्ट्र सचिव
डॉ. मुनीर तांबोळी, मानवी हक्क संरक्षण फेडरेशन राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर, दैनिक बेधडक महाराष्ट्र मुख्य संपादक अभिजित दरेकर, कार्यकारी संपादक संकेत घेवारे, प्रतिनिधी 
सचिन भालेराव आदींनी शुभेच्छा दिल्या.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.