-->
आपला महाराष्ट्र 24

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रायगड जिल्हा सरचिटणीसपदी सौ .कुंदा वैजनाथ ठाकूर

 उरण( सुनील ठाकूर ).महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या व महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या तसेच राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रमुख राजकीय पार्टीच्या रायगड जिल्हा महिला सरचिटणीस पदी सौ.कुंदा वैजनाथ ठाकूर  यांची निवड करण्यात आली आहे.
सुतारवाडी, ता. रोहा येथील खासदार सुनिल तटकरे यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या कार्यक्रमादरम्यान उरण तालुक्याचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्यसौ. कुंदा वैजनाथ ठाकूर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याची माहिती खासदार तटकरे यांनी दिली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते सौ. कुंदा वैजनाथ ठाकूर यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई मुंढे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार जिल्हयातील महिलांना विविध पदे देण्यात आली.
यावेळी खा. सुनिल तटकरे, नामदार आदितीताई सुनिल तटकरे (राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा), अनिकेत भाई तटकरे (आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था), उमाताई मुंडे (रायगड जिल्हा महिला अध्यक्षा), वैजनाथ ठाकूर (माजी जिल्हा परिषद (सदस्य), विशाल पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच सदस्य यावेळी उपस्थित होते.सौ.कुंदा ठाकूर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.