-->
आपला महाराष्ट्र 24

राज साहेब ठाकरे यांच्या वाढ दिवसा निमित्त उलवे शहर मनसे तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

 उरण ( सुनील ठाकूर ).राज साहेब ठाकरे यांच्या वाढ दिवसा निमित्त उलवे मनसे तर्फे वहाळ पंचायत समिती गणातील उलवे .कोंबडभुजॆ.गणेशपुरी .तरघर येथील शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप वाढ दिवसाच्या निमित्तने उलवे मन से चे शहर अध्यक्ष श्री राहुल पाटील व सौ .मनीषा राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून उलवे .कोंबडभुजे तरघर .गणेशपुरी आदी रा.जी. प .शाळेतील विद्यार्थ्यां ना शैक्षणिक साहित्य वाटप करून राज साहेबांचा 54 वा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा झाला. सदर कार्यक्रम मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हाध्यक्ष मा. संदेश भाई ठाकूर .जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी .तालुका अध्यक्ष रामदास पाटील .वाहतूक सेनेचे अल्पेश कडू .उपतालुका अध्यक्ष संदेश भगत.चित्रपट सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश कोळी.शहर सचिव मनोज कोळी .गणेशपुरी शाखा अध्यक्ष चेतन कोळी .उपाध्यक्ष सुनील कोळी उलवे शाळेचे मुख्याध्यापक श्री पदमाकर म्हात्रे .कोंबडभुजे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .नंदिनी भोईर गणेशपुरी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .योगिता काळे .तरघर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .कीर्ती पाटील . आदी सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन श्री नरेश पवार यांनी केले तर आभार उलवे शाळेचे मुख्याधापक श्री पदमाकर म्हात्रे यांनी मानले .





Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.