-->
आपला महाराष्ट्र 24

पंचरत्न मित्र मंडळ मुंबईतर्फे श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यामंदिर, अणसुरे येथे शालेय साहित्याचे वाटप

उरण ( सुनील ठाकूर)
        समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत.या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य , कपडे , गृहोपयोगी वस्तू , औषधे , वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळूंखे , उपाध्यक्ष रमेश पाटील , सहसचिव वैभव घरत , सल्लागार हनुमंता चव्हाण यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.मंडळाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली असून आजपर्यत मंडळाच्यावतीने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर मुंबईतर्फे कोकणातील श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यामंदिर, अणसुरे,ता. राजापूर, जि.रत्नागिरी येथे शालेय वस्तू (वह्या,स्कूल बॅग,शैक्षणिक साहित्य,छत्र्या)तसेचप्रयोगशाळेतील सामान व खाऊ वाटप असा कार्यक्रम पार पडला.शिवाय झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे रामदास शिर्के (कला शिक्षक -समाजसेवक), चंद्रकांत जानस्कर् (कृषीरत्न पुरस्कार- आदर्श शेतकरी), तसेच मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड,तसेच उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सल्लागार हनुमंता चव्हाण, सभासद प्रकाश मांडवकर, म्यॅथू.डिसोझा, डी.मिश्रा, संदीप पाटील, तुकाराम वणे, रहीम शेख, सुनिल इत्यादी उपस्थित होते.याप्रसंगी शिर्के सरांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पंचरत्न मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.



            माणसाच्या आयुष्याची जडण घडणीत वह्या पुस्तकांच्या शिड्यांची भूमिका महत्वाची असते, वह्या पुस्तकांमुळेच मानवाची खऱ्या अर्थाने प्रगती होत असते असे प्रतिपादन मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले .प्रत्येकाने समाजासाठी थोडे तरी योगदान दिले पाहिजे याच भावनेतुन पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर यांनी आपल्या आयुष्याच्या प्रगतीसाठी प्रयत्नाची सुरुवात करणाऱ्या बाल गोपालांना विनामुल्य वह्यांचे वाटप केले आहे, त्यांचे हे कार्य कौतुकास पात्र आहे असे मत अनेकांनी यनिमित्ताने व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव घरत यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अशोक भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे मनापासून आभार व्यक्त करून यापुढेही आपले सर्वांचे असेच अमूल्य सहकार्य मंडळाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.