-->
आपला महाराष्ट्र 24

उरण रानसई येथे आदिवासी विद्यार्थ्यांना वाटप केलं शालेय उपयोगी समान !

*रुपेशदादा धुमाळ यांनी जन्मदिवस साजरा करून केला एक आदर्श निर्माण !!*
    उरण (सुनिल ठाकूर ). आपला समाज आणि आपले समाजबांधव यांच्या न्यायहक्कासाठी लढणारी संघटना ,प्रत्येक भूमिपुत्रांच्यां पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटना !...अर्थात ...*आगरी,  कोळी,कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य* आणि या संघटनेचे युवा तरुण तडफदार.. अध्यक्ष .सन्माननीय श्री.रुपेशदादा धुमाळ यांचा अभिष्टचिंतन सोहळा एका आदर्शवत आणि प्रेरणादायी कार्याने सजवला तो दूर - दुर्गम भागात राहणाऱ्या माझ्या दिन दुबळ्यां आदिवासी समाज बांधवांना आणि त्यांच्या चिमुकल्या रानपाखरांना आपल्या परीने काहीतरी सहकार्य, काहीतरी मदत मिळावी याच उदात्त हेतूने  !उरण येथील  *रानसई आदिवासी वाड्यांवरील*.आदिवासी विद्यार्थी बालगोपालां करिता व  आदिवासी बांधवांकरिता.. एक अनोखी सौगत घेऊन आला तो *रुपेशदादा धुमाळ* यांचा अभिष्टचिंतन सोहळा !.. आणि याच शुभ दिनी ..त्या चिमण्या रानपाखरांनां शालेय शिक्षणाकरिता...शालेय साहित्य...ह्या साहित्यात ...सुंदर अशी .*दप्तरं,वह्या,कंपॉस बॉक्स,पेन,पेन्सिल,खोडरबर,कलर स्केचपेन,शार्पणर,फूटपट्टी* आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.      
      असं म्हणतात समाजकार्य करावं तेही निस्वार्थ भावनेतून मग ते कार्य कोणतेही असो आपलं योगदान हे शंभर टक्के असावं अशी मंशा बाळगणारी माणसं पण या जगात पाहायला मिळतात त्यातलंच एक नाव .*रुपेशदादा धुमाळ* या उमद्या तरुण युवकाने आपल्या संघटन कौशल्याने आपल्या समाजातील सुशिक्षित,सुसंस्कारी होतकरू भूमिपुत्र नवंतरुणांना संघटित करून आपल्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांच्या सहकार्यातून आपल्या हक्काची संघटना स्थापन करून खऱ्या अर्थाने आज आपल्या समाजबांधवां करिता एक आशेचा किरण म्हणून नावारूपाला आलेली संघटना आणि त्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून आज तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेत ते *रुपेशदादा धुमाळ*. आणि *आगरी,कोळी,कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शालेय साहित्य वाटप करताना शाळेतील चिमुकल्या बच्चे कंपनी सोबत आलेला अविस्मरणीय अनुभव हा आजचे उत्सवमूर्ती *रुपेशदादा धुमाळ* आणि तिथे उपस्थित प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील आठवणींचा कोंदणात साठवून ठेवण्याजोगाच होता त्या निरागस रानपाखरांना ह्या भेट वस्तू मिळाल्यावर ती इतकी आनंदीत झाली होती ते त्यांच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद पाहून तिथे उपस्थित सर्वजण अक्षरशः भारावून गेले होते त्यातच त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच्यां स्वागता करिता स्वतः आपल्या हातांनी रानफुलांचे  बनवून आणलेले पुष्पगुच्छ खूपच मनमोहक आणि सुंदर त्याच बरोबर त्या रानपाखरांनीं *रुपेशदादांना* जन्मदिनाचं गाणे म्हणत दिलेल्या हृदयस्पर्शी शुभेच्छा खरचं मन भारावून टाकणाऱ्या आणि मनाला एक वेगळाच आत्मिक समाधान देणाऱ्या देखील.आणि म्हणूनच ह्या दूर- दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत आणि खास करून लहान चिमुकल्या विद्यार्थ्यां सोबत प्रत्येकानं आपले जन्मदिवस साजरे करून आपले सामाजिक दायित्व जपलं पाहिजे अश्या प्रकारचा प्रेरणादायी संदेश हा आज ..रुपेशदादा धुमाळ* यांच्या जन्मदिनाच्या माध्यमातून समाज्याचा एक वेगळा आदर्श निर्माण करेल आणि प्रत्येकाला प्रेरणा देईल एवढं मात्र नक्की !...
  या वेळी .युवा शिवव्याख्याते आणि संघटनेचे प्रवक्ता *विवेकदादा भोपी* आणि रायगड भूषण .मा.राजू मुंबईकर साहेब* यांनी ..आपलं मनोगत व्यक्त करतांना *रुपेशदादांच्या* सामाजिक कार्याचा आणि त्यांना आपल्या समाजाकडून मिळणाऱ्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा लेखा-जोखा मांडत जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
     *मा.श्री.रुपेशदादा धुमाळ* यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या करिता खास प्रमुख उपस्थिती दर्शविली ती . रायगड भूषण.*मा.श्री राजू मुंबईकर  (संस्थापक - केअर ऑफ़ नेचर सा.संस्था ),*मा.श्री.स्नेहल पालकर* (अध्यक्ष- केअर ऑफ़ नेचर सा.संस्था). *मा.श्री.भारतदादा भोपी* ( उपाध्यक्ष--आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था महाराष्ट्र राज्य),*मा.श्री.रोहन पाटील* (व्यावसायिक क्षेत्र अध्यक्ष ),*मा. विवेक भोपी* ( प्रवक्ता,) *श्री.किरण पवार* (संघटक),*मा.श्री.वृषभदादा गोंधळी* ( कामोठे शहर अध्यक्ष),*मा.प्रदीप पाटील* (पनवेल तालुका अध्यक्ष),श्री.कुणाल नाईक (व्यावसायिक सल्लागार),*मा.श्री.प्रकाशदादा पाटील,मा.सुमित थले*( उरण तालुका अध्यक्ष),*मा.श्री.अनिल घरत*( उरण तालुका सचिव),*मा.श्री.रविंद्र भोईर*( उरण तालुका शहर अध्यक्ष),*मा.करणद नारंगीकर* (प्रसिद्धीप्रमुख),*मा.श्री.चंद्रशेखरद भोमकर, मा.श्री.समाधान पाटील*( सामाजिक कार्यकर्ते) रानसई प्रा.शाळेच्या शिक्षिका  *मा.सौ.कडू मॅडम* आणि शाळेतील विद्यार्थी वर्ग रानसई आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांध मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.







Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.