-->
आपला महाराष्ट्र 24

दिघोडे येथील विविध विकास कामांचा आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन

उरण (सुनील ठाकूर ).
दिघोडे गावा च्या विकासासाठी मेहनत घेणारे युवकांचे प्रेरणास्थान जय मातादी ग्रुप चे अध्यक्ष मयूर घरत. रमेश (नाना) पाटील व निलेश पाटील यांनी आपल्या गावातील गावात जाणाऱ्या रस्त्याची दैनिय परिस्थिती लक्षात घेता या रस्त्याची मागणी आमदार महेश बालदी यांच्याकडे केली. त्यांच्या मागणी ची दखल घेत आमदार महेश बालदी यांनी आपल्या स्थानिक विकास (जिल्हा नियोजन) निधीअंतर्गत दिघोडे येथील एस टी स्टँड ते पासून श्रीराम मंदिर कडे जाणारा रस्ता. काँक्रिटीकरण करणे व गटाराचे बांधकाम आदी कामांकरता निधी दिला. नुकताच या कामांचे भूमी पूजन आमदार महेश बालदी उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर भूमी पुजन समारंभास आमदार महेश बालदी. तालुका अध्यक्ष रवी भोईर .जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत. उपनगराध्यक्ष जयवीन कोळी .शहर अध्यक्ष कौशिक शहा .पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील . सरपंच सौ.सोनिया मयूर घरत. माजी सरपंच एकनाथ माळी. अंबाजी कोळी. ग्रामपंचायत सदस्य श्री शरद कोळी. सौ. उर्मिला कोळी . सौ. कविता म्हात्रे .सौ शारदा कासकर . जय मा तादि अध्यक्ष मयूर घरत रमेश( नाना) पाटील.भाजप युवा अध्यक्ष निलेश पाटील .भाजप गाव अध्यक्ष राजेश पाटील .मयूर माळी . अश्विन पाटिल .राकेश म्हात्रे .भावेश म्हात्रे .मयूर पाटिल सुधीर बुवा पाटील.अस्मक पाटील आदि सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.