उरण (सुनिल ठाकूर )
आर.सी.एफमध्ये पंचवीस वर्षे (रौप्यमहोत्सवी )अविरत सेवा केल्याबद्दल आर.सी.एफचे सन्मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.एस.सी. मुडगेरीकर साहेब यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अशोक दामू भोईर यांना तसेच सौ. सीमा अशोक भोईर यांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी आर.सी.एफ पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.अनेकांनी भोईर यांना अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

