-->
आपला महाराष्ट्र 24

उरण चारफाटा मच्छिमार मार्केट चे भूमिपूजन

उरण ( सुनिल ठाकूर ) 
 उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हददीतील उरण चारफाटा मच्छिमार मार्केट चे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मंगळवार ( दि. ३१) झाले . 
 सिडकोच्या प्लान मध्ये द्रोणागिरीत फिश मार्केट रिझर्वेशन आहे हे पाहून दोन वर्षापूर्वी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर असतांना सिडको कडे मच्छिमार मार्केटसंबधी प्रस्ताव टाकला होता त्याचा नेहमी पाठ पुरावा करून त्याला यश आले आहे .सिडकोच्या माध्यमातून सुमारे दीड ते दोन कोटीचे मच्छी  विक्रेत्यांसाठी सुसज्य व अद्यावत  असे मच्छी मार्केट उभारण्यात येणार आहे .त्यांचे भूमिपूजन आज झाले आहे ,एका वर्षात हे पूर्ण होईल .आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे आपण करीत आहोत .असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी भूमिपूजन उद्घाटन प्रसंगी केले .
या वेळी नगरध्यक्षा सायली म्हात्रे , उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर , ,उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह जिल्हा उपाध्यक्ष, नीलकंठ घरत,नगरसेवक राजेश ठाकूर ,नगरसेविका दमयंती म्हात्रे ,नगरसेविका जान्हवी पंडीत ,उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी ,नगरसेविका आशा शेलार ,नगरसेविका रजनी कोळी ,उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील  उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील , चाणजे ग्रामपंचायत सरपंच अशोक कोळी ,सदस्य अजय म्हात्रे ,,सदस्या सोनाली ठाकूर  सदस्या प्रणिती म्हात्रे , नारायण नाखवा ,,नित्यानंद भोईर ,चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत ,भारत गुरव ,महेश भोसले राजेश गावडे , मच्छी विक्रेत्या महिला वर्ग  भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.