-->
आपला महाराष्ट्र 24

अवैध.कंटेनर पार्किंग समस्या सुटल्याने सोनारी ग्रामस्थानी मानले पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाचे आभार .

उरण (सुनिल  ठाकूर )
   सोनारी गावा लगत च्या  आजूबाजूच्या परिसरात  करळ  पूल स्पीडी यार्ड. पेट्रोल पंप या मार्गावर नेहमी उभे केलेले  मालवाहतूक, व अवैध कंटेनर  पार्किंग सोनारी ग्रामस्थांना घातक ठरत आहे. तसेच या अवैध कंटेनर पार्किंग मुळे अनेकांचे जीव गेले असून काहींचे अपघात सुद्धा झाले आहेत तर या अपघात होताना काही जण वाचलो  असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थानी दिल्या. मात्र एवढे घडून सुद्धा या कडे वाहतूक विभागाचे नेहमी दुर्लक्ष असते विशेष म्हणजे वाहतूक विभागाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असून सुद्धा अशा घटना घडतात. याबाबत वारंवार सोनारी ग्रामस्थ. व काही सामाजिक संस्थानी याबाबत कायदेशीर पत्रव्यवहार करून देखील ही समस्या सुटली नाही. त्यामुळे शुक्रवार दिनांक 20 मे 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता सोनारी ग्रामस्थ व महिला आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्या होत्या.. यावेळी या पुढे अवैध कंटेनर पार्किंग ची समस्या सुटली नाहीतर  पार्किंग केलेल्या गाड्या आम्ही फोडू असा पवित्रा  ग्रामस्थानी घेतला होता. याची दखल घेत वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाने घेऊन या ठिकाणी डिव्हायडर लावून सर्व्हिस रोड वरील उभी राहणारी अवैद्ध पार्किंग हटविली. याबद्दल  सोनारी ग्रामस्थानी वाहतूक विभागाचे अधिकारी  श्री. कुलकर्णी साहेब यांची व पोलीस ठाण्या चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक.श्री.निरज पंजाबगव चौधरी   यांची भेट घेऊन अभिनंदन केले.  यावेळी अभिनेत्री कु. अनघा प्रदीप कडू ,  तसेच (स्पर्श सामाजिक संघटना अध्यक्षा सौ.अल्पा दीपक कडू ,सौ. अंकिता अल्पेश कडू.  श्री.अल्पेश अशोक कडू व हितेश जगदीश कडू आदी उपस्थित होते.




Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.