-->
आपला महाराष्ट्र 24

रत्नेश्वरी देवीचे मंदीर वाचवण्यासाठी जसखार ग्रामस्थांचे आंदोलन

कोर्टाच्या आदेशाला हरताळ फासत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भटे यांनी दिले काम सुरू करण्याचे आदेश?
उरण( सुनील ठाकूर).
मंगळवार दिनांक 31/05/2022 रोजी सकाळी दहा वाजता जसखार गावाचे सरपंच दामू शेठ घरत , ग्राम पंचायत सदस्य आणि 150 - 200 ग्रामस्थांनी एकत्र येवून रतनेश्वरी मंदिरा मध्ये मीटिंग घेवून एन एच आय ए कंपनीचे सुपरवायझर श्री दिपक जाधव, श्री शिवकृत आणि श्री कामेश्वर सिंग यांना बोलावून विचारणा केली की आपण हे काम कोणाच्या परवानगीे ने सुरू केलेत? त्या वेळेस त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली. त्या तिघांनीही असे सांगितले की न्हावा शेवा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भटे यांनी काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सरपंच दामू शेठ यांनी श्री भटे यांनी परवानगी दिल्याचे पत्र दाखवायला सांगितले असता , तसे लेखी पत्र नसल्याचे सांगितले. जसखार गावा शेजारून जाणाऱ्या ब्रीज मुळे रत्नेश्वरि मदिराला मोठे तडे गेले असून त्याला धोका निर्माण झाला आहे. त्या मंदिरा संदर्भात ग्रामस्थांनी जेएनपीटी प्रशासनास मागणी केली होती की मंदिराची संपूर्ण जबाबदारी जेएनपीटी ने लेखी स्वरूपात घ्यावी. परंतु त्यावर जेएनपीटी प्रशासन निर्णय घेण्यास तयार नाही. ब्रीज आणि रस्त्याच्या कामामुळे घरांना हादरे बसून तडे गेले आहेत आणि ती घरे कधीही कोसळू शकतात. त्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. रस्त्याच्या भरवामुळे मागील पाच वर्षे गावात पाणी घुसून ते पाणी घरत कमरे एवढे शिरून अतोनात नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई आणि उपाय योजने कडे दुर्लक्ष होत आहे. यश बाळू शेळके ह्या मुलाला विजेचा धक्का लागून त्याला कायमचे अपंगत्व आले आहे, त्याला नुकसान भरपाई म्हणून मान्य केलेली रक्कम पैकी एक रुपया देखील दिलेला नाही. ग्राम पंचायत जस खार आणि युवा सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक वेळा पत्र व्यवहार करून त्याचा पाठ पुरावा देखील केला आहे. परंतु त्यावर कोणतीही उपाय योजना होताना दिसत नाही. हे सर्व प्रश्न प्रलंबित ठेवून पोलिसांचा धाक दाखवून ग्रामस्थांना घाबरवण्याचा प्रयत्न चालू आहे. ग्राम पंचायत जसखार यांनी कोर्टात केस दाखल केली असून ती सुरू असताना देखील कोर्टाच्या आदेशाला हरताळ फासत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भटे हे काम सुरू करण्याचे आदेश कसे देवू शकतात हा प्रश्न सर्व ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यांना असे आदेश देण्याचे अधिकार आहेत का? न्हावा शेवां पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली आहे याचा विसर पडला आहे, नको त्या विषयात लक्ष घालून नको त्या भूमिका बजावत आहेत. ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून काम बंद केले असून या पुढे ग्राम पंचायत ची परवानगी घेतल्या शिवाय काम सुरू न करण्याचे आश्वासन दिले आहे. ब्रीज चे काम रीतसर ग्राम पंचायत ची परवानगी न घेता सुरुवात केल्याने ग्राम पंचायत वतीने मान पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या कडे तक्रार करण्यात येणार आहे असे जस खार ग्रामस्थांनी सांगितले. आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी ॲड. केवल पाटील, ॲड अमर पाटील, ॲड केशव पाटील, ॲड. मीनाक्षी पाटील , माजी सरपंच नवीन शेवा निशांत घरत, जसखार गावचे सरपंच दामू शेठ घरत, महिला सदस्य योगिता ठाकूर आणि नम्रता ठाकूर तसेच यूवा सामाजिक संस्थे चे अध्यक्ष हर्षल ठाकूर आणि पदाधिकारी आणि उरण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.













Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.