उरण (सुनिल ठाकूर )
कोल्हापुरातील युवा पत्रकार संघाच्यावतीने शहरातील नष्टे लॉन इथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला.
युवा पत्रकार संघाच्यावतीने, राज्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्य केले जाते. नवोदित पत्रकारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. या संघाच्यावतीने, विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणार्या व्यक्तींसाठी नष्टे लॉन इथे पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार जयश्री जाधव, सिनेअभिनेत्री पूजा जयस्वाल, माजी नगरसेवक दिलीप पोवार, अशोक भंडारे, राहुल चव्हाण, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, ऍडव्होकेट संदीप पोवार, प्रशांत पाटील, संजय वाघ, उदय बेलवलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत अभिषेक मोहिते यांचा संघाच्यावतीनं विशेष सन्मान करण्यात आला, यानंतर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या माध्यमकर्मींना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पत्रकार गायत्री घुगे (महाराष्ट्र रोजगार - मुंबई), रेणुका धायबर (मुंबई), ऐश्वर्या पेवाल(मुंबई), ज्येष्ठ पत्रकार सतीश सरिकर (कोल्हापूर) यांच्यासह मान्यवर पत्रकारांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रतन हुलस्वार, जावेद देवडी, बाबूराव वळवडे, अजय शिंगे, रत्नदीप चव्हाण, तुकाराम कदम, प्रवीण मिरजकर, मार्था भोसले, रविराज जगताप, अर्चना चव्हाण, अस्मिता जाधव, दयानंद निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
