-->
आपला महाराष्ट्र 24

केमिस्ट असोसिएशनतर्फे महाराष्ट्र दिन साजरा

उरण (सुनिल ठाकूर )
    केमिस्ट असोसिएशन उलवे या संस्थेच्या वतीने ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त उलवेतील फार्मासिस्ट बंधू भगिनींनी महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून बाईक रॅली काढण्यात आली होती. तसेच फार्मसिस्ट बंधू भगिनींकरिता फार्मसी व्यवसायासबंधित स्लोगन स्पर्धेचे आयोजन आले. यावेळी आयोजित सर्वकृष्ठ वेशभूषा स्पर्धेचे एनआरआय पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संदीप शिरसाठ यांनी स्पर्धेचे पारितोषिक पटकावले. आणि सर्वकृष्ठ फार्मसी व्यवसायासबंधित स्लोगन स्पर्धेचे पारितोषिक रोहित शिंदे आणि सौ. धनश्री शिंदे या फार्मासिस्ट जोडप्याने पटकावले.

संस्कृतीची जोपासना करणे, हे आपले कर्तव्य आहे . भारतीय सण समारंभ, दैनंदिन जीवनातही आपल्या संस्कृतीचाच अंगीकार केला पाहिजे, असे मत केमिस्ट असोसिएशन उलव्याच्या अध्यक्षा सौ. सीमा सुभाष पाटील यांनी व्यक्त केले. त्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या रॅलीची सांगता लांगेश्वर मंदिराजवळ झाली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.