-->
आपला महाराष्ट्र 24

श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण यांच्या वतीने ई्-श्रम कार्ड वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.

उरण (सुनिल  ठाकूर ).
        आज आपण पहातो की, वाढदिवस साजरा करायचा म्हटला की मोठमोठे हॉटेल किंवा मौजमजेच्या ठिकाणाची निवड केली जाते आणि वाढदिवसाची मजा लुटली जाते परंतु सामाजिक बांधिलकीचा मनुष्यास विसर पडत आहे. परंतु हीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य व आपला वाढदिवस काहीतरी समाजहितासाठी साजरा व्हावा या उद्देशाने श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण या संस्थेच्या अध्यक्षा रायगड भुषण सौ. संगिता ताई ढेरे यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण व ई-श्रम कार्ड वाटप करून साजरा केला. 




          दिनांक ३/५/२०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता कोटगाव काळाधोंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत, व व्यायाम शाळेच्या आजुबाजुला शोभेची झाडे  व फुलझाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच याच  ठिकाणी ई-श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
     वृक्षारोपण व ई-श्रम कार्ड वाटप या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केअर ऑफ नेचर चे अध्यक्ष रायगड भूषण राजु दादा मुंबईकर,  कोटगावचे अध्यक्ष योगेश गोवारी, काळाधोंडा जिल्हा परिषद शाळेचे चेअरमन नवनीत भोईर, जेष्ठ नागरिक शंकर भोईर, कोटगावचे पंच कमिटी सदस्य जितेंद्र भोईर, व इतर कोटगाव ग्रामस्थ, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण च्या अध्यक्षा सौ. संगिता ताई ढेरे,  उपाध्यक्षा सौ.पुजा प्रसादे,सौ. वैदेही वैवडे, सौ.कविता म्हात्रे, सौ.सुप्रिया सरफरे, सौ.अभया म्हात्रे,  सौ.सारीका भोईर, , कु.महिमा म्हात्रे अष्टभुजा हिरकणी व   पत्रकार सौ. तृप्ती भोईर  कु.साहिल प्रसादे शाम भाऊ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.





      मान्यवरांना एक एक वृक्ष देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. केअर ऑफ नेचर चे अध्यक्ष राजु दादा मुंबईकर यांनी श्री समर्थ  कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण या संस्थेसाठी ई-श्रम कार्ड मोफत उपलब्ध करून दिले. तसेच राजु दादा मुंबईकर यांनी सौ.संगिता ताई ढेरे यांच्या हातुन वेळोवेळी  होणाऱ्या  समाजकार्यातील योगदानाचा इथे विशेष  उल्लेख केला. जमलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते शोभेची  व फुलझाडे लावण्यात आली. तसेच या लावलेल्या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी कोटगाव ग्रामस्थांनी घेतली आहे.
     श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण च्या अध्यक्षा सौ. संगिता ताई ढेरे व त्यांच्या सहकारी टिमचे कोटगाव ग्रामस्थांनी आभार मानले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.