- अवैध कंटेनर पार्किंग बाबत सोनारी ग्रामस्थ, महिला आक्रमक
उरण (सुनिल ठाकूर ).
सोनारी गावा लगत च्या आजूबाजूच्या परिसरात करळ पूल स्पीडी यार्ड. पेट्रोल पंप या मार्गावर नेहमी उभे केलेले मालवाहतूक, व अवैध कंटेनर पार्किंग सोनारी ग्रामस्थांना घातक ठरत आहे. तसेच या अवैध कंटेनर पार्किंग मुळे अनेकांचे जीव गेले असून काहींचे अपघात सुद्धा झाले आहेत तर या अपघात होताना काही जण वाचलो असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थानी दिल्या. मात्र एवढे घडून सुद्धा या कडे वाहतूक विभागाचे नेहमी दुर्लक्ष असते विशेष म्हणजे वाहतूक विभागाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असून सुद्धा अशा घटना घडतात. याबाबत वारंवार सोनारी ग्रामस्थ. व काही सामाजिक संस्थानी याबाबत कायदेशीर पत्रव्यवहार करून देखील ही समस्या सुटली नाही. त्यामुळे शुक्रवार दिनांक 20 मे 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता सोनारी ग्रामस्थ व महिला आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्या होत्या.. यावेळी या पुढे अवैध कंटेनर पार्किंग ची समस्या सुटली नाहीतर पार्किंग केलेल्या गाड्या आम्ही फोडू असा पवित्रा ग्रामस्थानी घेतला . यावेळी ग्रामस्थान च्या वतीने वाहतूक विभागाला निवेदन देण्यात आले. यावेळी सौ.पुनम महेश कडू (सरपंच,सोनारी).सौ अल्पा दीपक कडू (अध्यक्ष -स्पर्श सामाजिक संघटना ). अभिनेत्री कु.अनघा प्रदीप कडू.सौ.अंकिता,अल्पेश.कडू..सौ. सौ.वासंती अशोक कडू.सौ.सुजाता दिनेश कडू.सौ.अश्विनी हरीचंद्र कडू.सौ.ममता.प्रशांत कडू.सौ.रेश्मा.नंदकुमार कडू.सौ.प्रीती प्रदीप कडू
सौ.यशोदा तुळशीदास कडू.सौ.भारती भरत कडूसौ.स्वाती.हरेश कडू.सौ.हेमा जनार्दन तांडेल.सौ.प्रणाली मिनिष कडू.सौ.चेतना हरिदास कडू.श्री. अल्पेश अशोक कडू.श्री.आशिष अशोक कडू..श्री.दिनेश कृष्णा कडू.कु. हितेश जगदीश कडू.कु.निखिल प्रदीप कडू.कु.अनिकेत वसंत तांडेल.श्री.प्रदीप काळूराम कडू.श्री.विजय प्रभाकर तांडेल
श्री.दीपक भरत म्हात्रे. के. के. कडू आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुढे पोलीस प्रशासन याची कशी दखल घेते या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
