-->
आपला महाराष्ट्र 24

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

उरण ( सुनील ठाकूर).

    इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी निलेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन संघटनेची निवडणूक चौक, खालापूर येथे पार पडली. यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून इलेक्ट्रिकलची कामे करणारी असंख्य कॉन्ट्रॅक्टर निवडणुकीस उपस्थित होते.
    रायगड जिल्हा संघटनेचे ज्येष्ठ नेते राजेश सानप व माजी अध्यक्ष किरण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडणुकीत महावितरणच्या पेण सर्कल अंतर्गत असलेल्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी निलेश शरद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. तर जिल्ह्यातील चार डिव्हिजन मधून पेणचे धनंजय पाटील, रोह्याचे दादासाहेब धुमाळ, खोपोळीचे जंगम व अभिजीत जाधव यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर सचिव पदी कर्जतचे भालचंद्र जोशी व खजिनदार पदी दिनेश पाटील यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे ज्येष्ठ सभासद राजेश सानप यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
    यावेळी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी बोलताना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्सना भेडसावणारे विविध प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील. तसेच महावितरण कडून होणाऱ्या कॉस्ट डाटा संबंधीच्या दिरंगाई बद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
     दरम्यान झालेल्या मिटिंग वेळी संघटनेचे माजी अध्यक्ष किरण बोरसे यांची फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स ऑफ महाराष्ट्र (FECAM) च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. सदर निवडणुकीवेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून इलेक्ट्रिकलची कामे करणारी असंख्य कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.