-->
आपला महाराष्ट्र 24

आगरी कोळी बहुद्देशीय सामाजिक संस्थे च्या वतीने महाराष्ट दिन साजरा. समाज सेविका सौ. मनिषा राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती

  उरण (सुनिल ठाकूर ). 

आगरी कोळी बहुद्देशीय सामाजिक सेवा संस्था उलवे शहर यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त साई मंदिर वहाळ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महिलां साठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर, महिलां साठी खास आकर्षण चला जिंकूया पैठणी, तसेच महिलां साठी हळदी कुंकू असे असे कार्यक्रम   महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे शहर अध्यक्ष श्री राहुल पाटील यांच्या पत्नी  समाज सेविका सौ.मनीषा राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

सदर कार्यक्रमास सौ. प्रतिभा मढवी सौ. शोभना म्हात्रे सौ. आविधा मढवी सौ. शुभना कोळी,उलवे केमिस्ट असोसिएशन अध्यक्षा सौ. सीमा पाटील, उलवे शहर प्रमुख राहुल पाटील आदी सह बहू उद्देशीय आगरी कोळी सामाजिक संस्थे चे अध्यक्ष विनोद  कोळी उपाध्यक्ष  रमेश पाटील, सचिव शोभना म्हात्रे, खजिनदार विनायक कोळी, महिला सक्षमीकरण प्रतिभा मढवी, संपर्क प्रमुख विशाल भोईर, मस्त विभाग हेमंत वैती, मीडिया प्रमुख गणेश भोईर आदी सह मोठ्या संख्ये ने  महिला कार्यक्रमासाठी उपस्थित  होत्या.
 चौकट-  संस्कृती ची जोपासना करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय सण, समारंभ दैनंदिन जीवनात ही आपल्या संस्कृतीचा अंगीकार केला पाहिजे                                        
सौ. मनिषा राहुल पाटील   
समाज सेविका
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.