-->
आपला महाराष्ट्र 24

चिर्ले येथील साई मंदिराचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्सहात साजरा.

उरण (सुनिल ठाकूर ). 
गेली दोनवर्ष कोरोना च्या संकटा मुळे संस्थापक श्री जे के ठाकूर यांच्या कुटुंबियां चे चिर्ले येथील साई नंदिराचा वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला, यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने व शासनाने नियम शिथिल केल्याने साई मंदिराचा 25 वा वर्धापन दिन 1 मे रोजी मोठ्या उत्सहात व विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
 सकाळी 5 वाजता श्रींची काकड आरती साडे पाच वाजता संस्थापक माजी सरपंच श्री जे के ठाकूर व सौ जयश्री ठाकूर यांच्या हस्ते बाबां चे मंगल स्नान. 7. 30 ते 8. 30 वाजता डॉ. चंदन ठाकूर व सौ शीला चंदन ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक. सकाळी 9 ते 12 राधाकृष्ण भजन मंडळ चिर्ले यांचे भजन. बुवा गोवर्धन पाटील पखवाज रामा घरत (जासई ).दुपारी 12 वाजता श्रींची माध्यान्ह आरती पदाजी कुंडाजी ठाकूर यांचे हस्ते. दुपारी 12 ते 2 श्री समर्थ  शारदा मंडळ नवीन पनवेल 2.ते  3. 30 गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ गव्हाण कोपर  गायिका सुप्रिया घरत पखवाज तुषार घरत 3. 30 ते 5 गावदेवी प्रासादिक भजन कंठवली गायिका वंदना वसंत पाटील,पखवाज मयूर म्हात्रे खोपटे संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ (चिर्ले ). सायंकाळी 6 वाजता धुपारती संध्याकाळी 6.30 ते 8 श्री जय शिव शंकर  प्रासादिक भजन मंडळ  आवरे बुवा विकास वैश्विकर पखवाज   मनिष पाटील रात्री 9 वाजता श्री साई नाथांच्या पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता झाली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.