मात्र शासनाने दिलेल्या दोन महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 4 जुलै 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका बेमुदत काम बंद आंदोलन करणार
उरण (सुनिल ठाकूर ).
महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने 2 मे 2022 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय आपण घेतला होता
त्यानुसार संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने झाल्याने व संघर्ष समितीच्या वतीने कोणत्याही परिस्थितीत बेमुदत काम बंद आंदोलन होणारच अशी भूमिका घेतल्याने दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी नगरविकास सचिव महेश पाठक, मा सचिन सहस्त्रबुद्धे व महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली होती.
त्याचबरोबर मा एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्णयानुसार मा आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई यांच्याबरोबर दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी चर्चा झाली. यावर मा आयुक्त तथा संचालक डॉ किरण कुलकर्णी साहेब व उपायुक्त अनिकेत मानोरकर साहेब सह आयुक्त मल्लिकार्जुन पाटील साहेब यांनी त्यांच्या स्तरावरील मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत काही निर्णय घेतले...
जे निर्णय शासन स्तरावरून होणे अपेक्षित आहेत त्याबाबत चे प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत
संघर्ष समितीने केलेली तयारी पाहता महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाने संघर्ष समिती च्या नावाने पत्र देऊन आपण करत असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करावे असे लेखी पत्र दिले
या पत्रामध्ये सातवा वेतन आयोग थकबाकी हप्ते देणे. अनुकंपा नियुक्ती करणे विभागीय स्तरावर तात्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची समावेशन करणे. कोविड विमा संरक्षण देणे, सफाई कर्मचारी यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदावर समावेशन करणे, हद्दवाढ झालेल्या नगर परिषदेमधील कर्मचाऱ्यांचे समावेशन करणे, संवर्ग कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी गट-ब संवर्गातील परीक्षेद्वारे नियुक्ती देणे इत्यादी बाबत शासन सकारात्मक निर्णय घेऊन कारवाई करीत असल्या बाबत पत्रात दिले होते
तसेच नगर विकास मंत्री यांच्यासमवेत लवकरच प्रत्यक्ष बैठक घेण्याचेही नियोजन करण्यात येईल असे आश्वासन या पत्रामध्ये दिले होते.
तथापि अंशदायी निवृत्ती योजना, आश्वासित प्रगती योजना, वेतन अनुदान, सफाई कर्मचाऱ्यांची पदे मंजुरी करणे याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले असून वरिष्ठ स्तरावर याबाबत बैठक आयोजित करण्याबाबत स्वतः नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्यामुळे बहुसंख्य मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याने आपल्या संघर्ष समिती ने केलेल्या मागण्यावर उचित कारवाई करणेकामी 2 महिन्याचा अवधी द्यावा व आपण करत असलेले बेमुदत काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करावे असे आशयाचे पत्र आज संघर्ष समितीला दिले होते.
शासनाने दिलेल्या पत्रावर संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक डॉ डी एल कराड, रामगोपाल मिश्रा ,अँड सुरेश ठाकूर ,डी पी शिंदे,मुख्य संघटक संतोष पवार ,मुख्य संघटक अँड,सुनील वाळुजकर, अनिल जाधव, हरिभाऊ माळी, रामदास पगारे, पोपटराव सोनवणे, पांडुरंग नाटेकर व इतर संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली.
या चर्चे मधून शासनाने दिलेल्या पत्रानुसार दोन महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 4 जुलै 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे
त्यामुळे उद्या पासून करण्यात येणारे आपले आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे
याची सर्व महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या सर्व अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी
डॉ डी एल कराड
राज्य निमंत्रक तथा राज्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती ( CITU)
रामगोपाल मिश्रा
राज्य निमंत्रक तथा अध्यक्ष, नगरपरिषद महानगरपालिका कर्मचारी महासंघ (BMS)
डि पी शिंदे
राज्य निमंत्रक, तथा अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना
अँड, सुरेश ठाकूर
राज्य निमंत्रक, अध्यक्ष , म्युपल युनियन मुख्य
संतोष पवार
मुख्य संघटक , कार्याध्यक्ष
म्युन्सिपल मजूर युनियन
अँड सुनिल वाळूजकर
जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व मुख्य संघटक संघर्ष समिती




