-->
आपला महाराष्ट्र 24

वशेणी येथील कै.मधुकर मुरलीधर म्हात्रे यांचे दु :खद निधन.

 उरण (सुनिल ठाकूर ).
वशेणी येथील कै. मधुकर मुरलीधर म्हात्रे यांचे नुकताच वयाच्या 60 व्या वर्षी अल्पशा आजाराने दु ;खद निधन झाले. वयाच्या 18 व्या वर्षा पासून त्याने 12 वी पर्यंत शिक्षण घेऊन मुंबई येथे नोकरी साठी गेले. नोकरी करीत असताना त्यांचे मोठं मोठ्या व्यापारी उद्बोजक यांच्या सहवासात राहून एक उद्बोजक बनले. तसेच त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात नाव लौकिक मिळविले शिवसेना शाखा क्र. 205 काळाचौकी मुंबई येथे त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य सर्वाना ज्ञात आहे आज त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांना 1 मुलगा 1 मुलगी 3 बहिणी नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा उत्तर कार्य आज रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी राहत्या घरी वशेणी येथे होणार आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.