-->
आपला महाराष्ट्र 24

27 ,28 ,29 मे मनसे उरण महोत्सव २०२२ चे आयोजन

  उरण (सुनील ठाकूर ).
२७,२८ व 29 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण तालुका व मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बोकडवीरा सिड़को प्रशिक्षण भवन जवळच्या मैदान येथे प्रथमच भव्य दिव्य अश्या स्वरुपात मनसे उरण महोत्सव २०२२ याचे आयोजन करण्यात येणार आहे या मोहोत्सवात , विविध खाद्य पदार्थाचे कक्ष प्रॉपर्टी एक्सपो, ऑटोमोबाइल, लॉजिस्टिक्स जॉब.
फेर, यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
महोत्सवाचे खास वैशिष्ट्ये गजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई व राज्यातील इतर भागातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्यात प्रथमच मासळी महोत्सव या कार्यक्रमात असणार आहे.
जिथे गिराईक मासे खरेदी व सोबत त्याचा खाण्याच मनमुराद आस्वाद ही घेऊ शकतात,
सोबत राज्यातून प्रत्येक विभागातील प्रसिद्ध मसाले उदा. मराठवाडा, नागपूर, खानदेशी, कोकणी, मालवणी, कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध मसाले यांच प्रदर्शन असणार आहे. दैनंदिन आपल्या कामातून थोडीशी उसंत आपल्या गृहिणींना मिळावी यासाठी आयोजकां कडून त्यांच पाक कौशल्य दाखविण्यासाठी पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकी या नात्याने रायगड जिल्हयातील सर्व महिला बचत गट यानी बनवलेल्या
उत्पादकान बाजार पेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना मोफत कक्ष देण्यात येणार आहे. महिला
सक्षमीकरणासाठी एक छोटासा प्रयत्न.
आपल्या आगरी कोळी बांधवांची व्यवसायाचे ओळख संपूर्ण राज्यभर व्हावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात उरण येथून होत आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मराठी सिने कलावंत ही भेट देणार आहेत.

आयोजकांकडून संपूर्ण नागरिकांना आमंत्रण देण्यात येत आहे की आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे कारण हा महोत्सव सर्व उरण करांचा असून संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण मेजवानीच असणार आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा अध्यक्ष श्री संदेश ठाकूर व मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. महेंद्र बैसाणे त्यांच्या सोबत श्री सत्यवान भगत, श्री. राकेश भोईर, श्री. मंगेश वाजेकर, अल्पेश कडू, श्री. रितेश पाटील, सौ. सिद्धि आंगणे, सौ. संगीता ढेरे, श्री प्रणव कारखानीस व उरण तालुक्यातील सर्व मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांनी दिली .
संदेश ठाकूर जिल्हा अध्यक्ष मनसे

श्री महेंद्र बैसाणे मनसे रोजगार स्वयंम रोजगार जिल्हा अध्यक्ष







Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.