उरण (सुनिल ठाकूर )
आज रविवार दि. ८ मे २०२२ रोजी शिवसेना पुरस्कृत व श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशन अंतर्गत महात्मा गांधी मिशन (एम.जी.एम) मेडिकल कॉलेज हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक सर्जरी आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे करण्यात आले. या शिबिराचे शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री. शिरीष घरत साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच जिल्हाप्रमुख यांनी शिबीरास योग्य मार्गदर्शन केले.
या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला तसेच या शिबिरामध्ये प्लॅस्टिक सर्जरी, कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, मेंदूचे विकार, अस्थिव्यंग सर्जरी, त्वचारोग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया मोतीबिंदू वगळून, कान,नाक,घसा तपासणी व शस्त्रक्रिया अशा प्रकरच्या वरील व्याधींनीदान असल्यास योजनेच्या एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे येथे ज्यांचे उत्पन्न १ लाखांपेक्षा असेल अश्या कुटुंबाचा दारिद्र्य रेषेखालील पिवळ्या शिधा पत्रिका धारक, आणि अंत्योदय व केशरी शिधापत्रिका धारक यांचा समावेश असेल यांचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजन / प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहे.
या शिबिरास श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशन च्या अध्यक्षा भावना शिरीष घरत, प्रियंका शिरीष घरत, डॉ. योगिता शिरीष घरत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, विधानसभा समनव्ययक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, शहरप्रमुख गुरुनाथ पाटील, प्रदीप केणी, डी. एन. मिश्रा, सदानंद शिर्के, राकेश गोवारी, प्रवीण जाधव, शहर समन्वयक गिरीश धुमाल, सूर्यकांत म्हसकर, हरेश पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, महिला आघाडी उतालुका संघटिका सौ. टिया धुमाळ, तालुका संघटिका सौ. अनिता डांगरकर, पनवेल शहर संघटिका सौ. अर्चना कुळकर्णी, सौ. नम्रता शिंदे आयोजक श्री. अनुराग लेकुरवाळे, एम.जी.एम. कामोठेचे एकनाथ बागूल, अमोल इंगेवार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












