उरण (सुनिल ठाकूर ).
६ /५/ २०२२ रोजी महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज11 स्मृतिदिन शताब्दी संपन्न झाली.कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राचार्य,डॉ.पी.जी.पवार यांनी शाहू महाराजांचे कार्य याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले.खऱ्या अर्थाने जनतेचा राजा,जाणता राजा,कल्याणकारी राजा म्हणून शाहू महाराजांचा उल्लेख करावा लागतो.स्त्री शिक्षण,स्त्री समानता,शेती,उद्योग,तंत्रज्ञान या विषयावर भविष्याचा वेध घेऊन शाहू महाराजांनी काम केले.आरक्षण हा घटक त्यांनी प्रथम आपल्या संस्थानात सुरू केले.कार्यक्रमास उपप्राचार्य, प्रा.उत्तमराव घोरपडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुजाता पाटील यांनी केले,आभार व सूत्रसंचालन प्रा.सी.डी.धिंदळे यांनी केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,इतर सेवक उपस्थित होते.
