आगरी कलाकाराची मुख्यभुमिका असलेला चित्रपट ‘हम गया नही’ प्रदर्शनाच्या वाटेवर
(मयुरेश कोटकर दिसणार स्वामी समर्थांच्या भुमिकेत)
उरण (सुनिल ठाकूर ).
असं म्हणतात की ज्या अभिनेत्याने थिएटर (नाटके) केले असते तो कसलेला नट असतो. तब्बल पाच हजार पेक्षा जास्त नाटकाचे प्रयोग करणारे तसेच नटसम्राट ते आत्ताच्या शाहीर नंदेश उमप यांच्या शिवसोहळा नाटकात काम करणारे वा बाजीराव मस्तानी ते थेट सोनी वाहिनीवरील ‘चित्तोड की राणी पदमीनी’ सारख्या मालिकेत प्रमुख भुभिका साकारणारे सिनेअभिनेता मयुरेश कोटकर. अभिनेता मयुरेश कोटकर यांचा मुख्यभुमिका असलेला ‘हम गया नहीं’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
अभिषेक निकम चित्रपट दिर्गर्शित या चित्रपटात मयुरेश कोटकर हे मुख्य अशी स्वामींची भुमिका सादर केली आहे. याआधीही मयुरेश कोटकर यांनी महिंद्राच्या ‘स्वराज्य’ ट्रक्टरचा ‘ब्रॅन्ड ॲम्बॅसेडर’ असो वा ‘चांदी’ चित्रपट असो किंवा नुकतेच महाराष्ट्रभर प्रयोग हाऊसफुल होत असलेला ‘संत तुकाराम नाटक’ कलाक्षेत्रात चार चॉंद लावले आहेत. कोवीडच्या कठीण काळानंतर अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाट्यावर आहे ही रसिकांसाठी मोठी पर्वणी आहेच परंतू स्वामींचा चित्रपट म्हटलं की स्वाभी भक्तांना फार याबाबत आतुरता आहे. प्रस्तुत चित्रपट OTT माध्यमांवर प्रदर्शीत होणार असुन जगाच्या कोणात्याही कानाकोपऱ्यातून रसिकांना हा पहायला मिळेल त्याच बरोबर येत्या महिन्यात अजुन एक मुख्य भुमिका असलेला मराठी चित्रपट प्रदर्शीत होणार असल्याचे अभिनेता मयुरेश कोटकर यांनी वार्ताहराशी बोलतना सांगीतले.



