- (ताट,चमचे वाटप यांना बगल देत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा नवा पायंडा)
उरण (सुनिल ठाकूर ).
कै.सौ. अश्विनी रविंद्र तरे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमीत्त रविवार दि.२४/०४/२०२२ रोजी चिंऊताई फाऊंडेशन आणिरोटरी चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडी यांच्या संयुक्त विद्यामाने
‘आमच्या हिरकणीचा स्मृतीगंध’ ह्या शिबीराचे आयोजन करण्यात आले. पुण्यतिथी म्हटलं की जेवण आणि ताट न इतर वस्तु वाटप हे समीकरण बदवलत आपल्या माणसाच्या विचाराचा जागर करीत समाजाला काही त्यातून लाभ होईल या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे शिबीराचे आयोजक चिऊताई फाऊंडेशनचे सर्वेश तरेंनी सांगीतले. शिबीरात कर्करोगाबाबत डॉ.उन्नती कराळे अन डॉ.राजेश भोईर यांनी मार्गदर्शन तसेच त्यांच्या टीमने उपस्थितांची तपासणी केली. शिबीरात कर्करोगाची लक्षणे कशी ओळखायची अन कर्करोगग्रस्त रुग्णांना सरकारकडून काय अनुदान,मदत मिळते याचीही माहिती देण्यात आली.या शिबीराच मर्चंट नेव्ही ऑफिसर गणेश पाटील, अभिनेता मयुरेश कोटकर,ॲड.सुदर्शन साळवी,आगरीसेना संपर्कप्रमुख मनोज साळवी यांची देखील विशेष उपस्थिती होती.





