उरण: सुनिल ठाकूर
-सरदार महीपतरावं पानसे यांनी युद्ध काळात लढाई च्या यशा करिता खंडोबा देवाला नवस केला आणि त्यांनी यश मिळवलं त्या नवसा पोटी वाहिलेल्या ऐतिहास प्राप्त तलवारीला मेघडंबरीचे स्थान अद्यापही प्राप्त न झाल्याची खंत व्यक्त करीत आमदार संजय केळकर यांनी विजयदशमीचा मानकरी असलेल्या ऐतिहासिक महत्व प्राप्त तलावरील राष्ट्रीय शस्त्राचा दर्जा मिळवून देण्या बाबत विधानभवनात आवाज उठवणार असल्याचे जेजुरी दर्शन प्रसंगी सांगितले. मुंबई ठाणे विभागातील आमदार संजय केळकर हे आंबळे येघील छत्रपती संभाजी महाराज मेघदडंबरी अर्पण सोहळ्या नंतर खंडोबा देवदर्शना करिता आले होते या प्रसंगी खंडोबा चे दर्शन घेत त्यांनी गडाची पाहणी केली श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने विश्वस्त ऍड विश्वास पानसे यांनी त्यांचे प्रतिमा देऊन स्वागत केले यावेळी भाजपा मंडल शहर अध्यक्ष सचिन पेशवे आमदार यांचे सहकारी विकास पाटील, सदस्य सचिन मोरे, आर एस एसचे कार्यकर्ते आणि देवस्थान पी आर ओ सागर गोडसे, जेजुरी ग्रामस्थ शैलेश राऊत, गुरव पुजारी सचिन गुरव महेश शिंदे आदी मान्यवर उपस्तिथ होते.