उरण:सुनिल ठाकूर
डाबर इंडिया लिमिटेडच्या जगातील नंबर १ हेअर ऑइल' ब्रँड असलेल्या डाबर आमलाने शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एक अनोखी आणि हृदयस्पर्शी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिल्या आणि सर्वात प्रभावशाली शिक्षिकेचा म्हणजेच त्यांच्या आईचा सन्मान करण्यात आला आहे. ही नाविन्यपूर्ण मोहीम शिक्षक दिनाच्या पारंपारिक उत्सवाला एक नवीन वळण देते ज्यामुळे शिक्षक म्हणून आईची प्राथमिक भूमिका अधोरेखित होते.
या मोहिमेचा गाभा म्हणजे एक आधुनिक आणि हृदयाला भिडणारी रॅप फिल्म आहे जी आई- मुलाच्या नात्यातील कोमल भावना आणि ताजेपणा जिवंतपणे उलगडते. हा व्हिडिओ शिक्षक दिनावरील संवादाला नवा दृष्टिकोन देतो, वर्गाच्या चौकटीपलीकडे जाऊन आई आयुष्यभर देत असलेल्या शिकवणी आणि बळाचं उत्सवमूर्त स्वरूपात दर्शन घडवतो. तरुण पिढी आणि जेन-झीला आकर्षित करण्यासाठी रॅप या फॉरमॅटची निवड करण्यात आली आहे, ज्यातून आई हीच खरी शिक्षिका आहे हे प्रभावीपणे दाखवले आहे.
या मोहिमेला अधिक व्यापक करण्यासाठी एक खास मायक्रोसाईट तयार करण्यात आली आहे जिथे ग्राहक आपल्या आईसोबतचा फोटो अपलोड करू शकतात. त्याच्या बदल्यात त्यांना त्यांच्या आणि त्यांच्या आईचा फोटो असलेली एक अनोखी, वैयक्तिकृत डाबर आमला बॉटल थेट घरी पोहोचवली जाईल. ज्यांना डिजिटल पर्याय आवडतो त्यांच्यासाठी खास डिझाईन केलेली ई-बॉटल डाउनलोड करून ती सोशल मीडियावर शेअर करता येईल, ज्यामुळे हा उत्सव अधिक परस्परसंवादी आणि अविस्मरणीय ठरेल. ही खऱ्या अर्थाने नवयुगीन मोहीम आहे ज्यात ग्राहकांचा विश्वास आणि नातं जपणाऱ्या उत्पादनावर आधारित अनुभव दिला जात आहे.
*डाबर इंडिया लिमिटेडचे हेअर केअर मार्केटिंग प्रमुख श्री अंकुर कुमार* म्हणाले, " डाबर आमलामध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की प्रत्येक आई ही आपल्या मुलाची पहिली गुरू असते – ती आपल्यात आत्मविश्वास जागवते, बळ देते आणि निःस्वार्थ प्रेमाने आपलं संगोपन करते. या शिक्षक दिनी आम्ही या अनोख्या नात्याचा उत्सव साजरा करत आहोत आमच्या खास उपक्रमाद्वारे – ओड टू मदर्स. या अंतर्गत आम्ही एक हृदयस्पर्शी संगीत फिल्म तयार करत आहोत, जी आपल्या आयुष्यातील पहिल्या शिक्षिका म्हणून आईला समर्पित आहे. यासोबतच आम्ही सर्वांना आमंत्रण देत आहोत की त्यांनी आपल्या आईसोबतचा एक फोटो आमच्यासोबत शेअर करावा, आणि त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना आपल्या घडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या आईला प्रेम आणि कृतज्ञतेचा हा एक छोटासा मानाचा मुजरा म्हणून डाबर आमलाचे एक खास वैयक्तिकृत पॅक भेट देऊ."
*रेडिफ्यूजनचे इनोव्हेशन हेड मनिंदर आदित्यराज सिंग* म्हणाले, "आपल्या मूळ विचारधारेत आम्ही मानतो की मोठ्या कल्पना वेगाने साकार व्हायला हव्यात. डाबर आमलासाठीचा ‘द फर्स्ट टीचर’ हा त्याच विश्वासाचा पुरावा आहे फक्त पंधरवड्याच्या आत सर्जनशीलता आणि अखंड सहकार्यातून उभी राहिलेली ही मोहीम. या मोहिमेचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आत्मा—प्रत्येक मुलाची पहिली शिक्षिका म्हणून आईचा गौरव. ही अशी जागा आहे जिथे नवनिर्मिती आणि भावना एकत्र येतात, आणि याच कथनशैलीच्या भविष्यासोबत उभं राहण्यात आम्हाला अभिमान वाटतो."
या मोहिमेचा प्रचार विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर केला जाईल, ज्यामध्ये रॅप फिल्म हे मुख्य आकर्षण असेल. त्यासोबतच प्रेक्षकांना मायक्रोसाईटकडे वळवण्यासाठी आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आकर्षक आणि गतिमान क्रिएटिव्ह्ज देखील वापरले जातील.