-->
आपला महाराष्ट्र 24

श्रावण मास निमित्त साई भक्त राकेश मुगळे यांच्या घरी साईबाबा चरण पादुका दर्शन, भजन सोहळा व साई भंडारा संपन्न.


उरण :सुनिल ठाकूर       
श्रावण मास निमित्त गेली कित्येक वर्ष पुणे ते शिर्डी पायी वारी  करणारे साई भक्त दिंडी क्रमांक 1 पुणे.यांच्या वतीने श्री साई बाबा पादुका दर्शन व भजन सोहळा आणि महा प्रसादा चे आयोजन पूर्ण श्रावण मासा मध्ये प्रत्येक साई भक्तांच्या घरी एक दिवस साई बाबां च्या चरण पादुका एक महिना घरो घरी वास्तव्यास असतें. या सोहळ्या चा सांगता सोहळा दिंडी क्रमांक 1 मधील सदस्य राकेश दादा मुगळे यांच्या घरी संपन्न झाला.यावेळी नामांकित गायकांची हजेरी तसेच महा प्रसादा चे आयोजन करण्यात आले  होते. सकाळी 5  वाजल्या पासून रात्री 12 पर्यंत भजन सेवा चालू होती.
या सांगता सोहळा ची   सांगता राकेश मुगळे यांच्या समाधी सोडूनिया बाहेरी उठा  , उठा साई या  भैरवी ने झाली.
या सांगता सोहळ्यास प्रति शिर्डी चे शिल्पकार माजी आमदार प्रकाश जी देवळे, आमदार हेमंत रासने, सपना लाल चंदानी, धीरज घाटे (पुणे भाजप  शहर अध्यक्ष), हेमंत दादा दागड पट्टे, अमोल दागडपट्टे, बाबू बाणकर आदी सह साई भक्त मोठ्या सांख्ये ने उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.