-->
आपला महाराष्ट्र 24

सोलर उत्पादनांचा समग्र कारखाना उभारणीसाठीमहाराष्ट्र सरकार ‘ज्युपिटर इंटरनॅशनल’ चा करार


उरण:: सुनिल ठाकूर
 नागपूरमधील बुटीबोरी भागात सौर उत्पादनांचा एक अत्याधुनिक, एकात्मिक कारखाना उभारण्याच्या दृष्टीने ज्युपिटर इंटरनॅशनल कंपनीने महाराष्ट्र सरकारशी एक सामंजस्य करार केला आहे. ज्युपिटर इंटरनॅशनल ही फोटोव्होल्टाइक सोलर सेलचे उत्पादन व सोलर एनर्जीची सोल्युशन्स या क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल असा अंदाज आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल्सची निर्मिती आणि सोलर मॉड्यूल उत्पादन अशा संपूर्ण मूल्य साखळीचा समावेश असेल. म्हणजे, हा सोलर क्षेत्रातील एक संपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करणारा प्रकल्प असणार आहे. प्रकल्पामुळे रोजगाराच्या ८,३०० पेक्षा जास्त संधी निर्माण होतील, औद्योगिक वाढीला चालना मिळेल आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील क्षमता वृद्धिंगत होईल.

अलोक गरोडिया, व्यवस्थापकीय संचालक, ज्युपिटर इंटरनॅशनल लिमिटेड यांनी सांगितले,“तंत्रज्ञान, व्यापक प्रमाण आणि प्रादेशिक सक्षमीकरण यांच्या माध्यमातून भारतात अक्षय ऊर्जेचे भवितव्य निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमची गुंतवणूक या आमच्या दीर्घकालीन बांधिलकीचे प्रतीक आहे. महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”

‘ज्युपिटर इंटरनॅशनल’ चे दोन कारखाने सध्या हिमाचल प्रदेशमधील बड्डी येथे सुरू आहेत. या कारखान्यांची स्थापत्य क्षमता प्रत्येकी ५०० मेगावॅट असून एकूण क्षमता १.०० गीगावॅट आहे. नागपूरचा आगामी प्रकल्प हा कंपनीचा धोरणात्मक विस्तार असणार आहे. समग्र सौर ऊर्जेचा प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या कंपनीच्या धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.