उरण. सुनिलठाकूर : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केसीएफ फाऊंडेशन च्या वतीने मेयर Hall , अंधेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कामगिरी बद्दल पनवेल येथील सलमा नासिर खान यांना "महात्मा गांधी रत्न पुरस्कार २०२४" सुप्रसिद्ध अभिनेते सुरेंद्र पाल व आय .जी मोहन राठोड यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, संगीतकार दिलीप सेन,अभिनेता धीरजकुमार , हास्य कलाकार सुनिल पाल व जेष्ठ साहित्यिक मंजू लोढा यांच्या विशेष उपस्थितीत सदरहु पुरस्कार सलमा खान यांना प्रदान करण्यात आला.
सलमा नासिर खान या माझगांव विद्यार्थी संघ, महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था, Royal एज्युकेशनल अँन्ड सोशल वेल्फेअर असोसिएशन,अमरदीप बालविकास फाऊंडेशन, टी.एम.जी क्रीयेशन्स, लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अनुभूती साहित्य मंच इत्यादी संस्थेत कार्यरत आहेत.
यापूर्वी सलमा नासिर खान ह्या अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारानी सन्मानित आहेत.
सदरहु पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे विविध स्तरांवर सलमा नासिर खान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे