उरण (सुनिल ठाकूर ): दि 26/8/2024 रोजी बी. एस. पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दहीहंडचे आयोजन करण्यात आले. यावेळी विदयार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी विदयार्थ्यांनी राधा कृष्णाचा वेश परिधान करून नृत्य सादर केले. तसेच दही पोहे एकमेकांना देण्यात आले. दहीहंडी आपण कृष्ण जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी साजरा करतो.श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. अशाप्रकारे गोष्टीरुपाने विदयार्थीना माहिती देण्यात आली, व आपल्या पारंपरिक सणांबददल जागृकता आणली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलास पाटील यांनी विदयार्थ्यांना कृष्णा प्रमाणे नेहमीआपल्या मित्रांना मदत करण्याचा सल्ला दिला.
बी. एस. पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात साजरा.
byमुख्य संपादक - सुनील ठाकूर
•