-->
आपला महाराष्ट्र 24

शिवसेना शाखा क्रमांक 194 तर्फे दही हंडी उत्सव मोठया जल्लोषात साजरा.

                                                  उरण (सुनिल ठाकूर ):    सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कार्यसम्राट आमदार तथा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष मा. श्री सदा सरवणकर, कार्य तत्पर नगरसेवक समाधान सरवणकर, महिला महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर, यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना क्र. 194 तर्फे शाखा प्रमुख संतोष तेलवणे, शाखा समन्व्यक सुभाष उर्फ बाबू ठाकूर, महिला शाखा प्रमुख मंदा भाटकर, शाखा संघटक संदेश बेरडे यांच्या आयोजना खाली दही हंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या दही हंडीसोहळ्यास माहीम विधान सभा प्रमुख कुणाल वाडेकर,भाई परब (विधानसभा समन्व्यक ), विधान सभा संघटक गणेश कदम, शिवसेना महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना उपाध्यक्ष् श्रेयश पाडावे, आदि मान्य वरांनी भेट दिली.
 सदर दही हंडी सोहळा पार पाडण्या साठी शिवसेना 194 चे शाखा प्रमुख संतोष तेलवणे, शाखा समन्व्यक सुभाष (बाबू )ठाकूर, महिला शाखा प्रमुख मंदा भाटकर,उप विभाग प्रमुख अश्विनी  कुलकर्णी, महिला शाखा समन्व्यक रोहिणी भाकरे, महिला शाखा संघटक जानवी कुंभार, सह संघटक अंजलीसौदालकर,संतोष खंदारे (उपशाखा प्रमुख ), दिलीप चव्हाण (उपसमन्वयक ), दिलीप परमार (उपशाखा प्रमुख ), सुरेश जकानी (उपशाखा प्रमुख ), संजय तोडणकर (गट प्रमुख ), अशोक कापसे (गट प्रमुख ) आदी पदाधिकारी सह कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.