-->
आपला महाराष्ट्र 24

श्रीराम महाजन यांच्याकडून शैक्षणिक साहित्यांचे वाटप.

उरण (सुनिल ठाकूर ).
मुंबई चेंबूर येथील कर्नाटक हायस्कूल येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक श्रीराम महाजन यांच्या आजी कै. गं. भा. लक्ष्माबाई रामचंद्र महाजन यांच्या उत्तरकार्याच्या  निमित्त जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पिंपळवाड (म्हाळसा ) या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी  सर्व विद्यार्थ्यांना वह्याचे   (शैक्षणिक साहित्य) वाटप करण्यात आले. 
       या उपक्रमात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत महाजन यांच्या कडून करण्यात आली. या आधी सुद्धा महाजन यांनी त्यांच्या वडिलांच्या  पुण्यतिथी निमित्त शाळेला शालेय पुस्तकांची मदत केली आहे.
      तसेच प्रत्येक वर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्याचे मदत करत असतात. त्यांचा हा उपक्रम अविरत चालू आहे. ग्रामिण भागातील विदयार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य पुरेशा प्रमाणात नसते, म्हणून या शैक्षणिक साहित्याचा उपयोग विद्यार्थीना होईल असे मत महाजन यांनी व्यक्ती केले.तसेच महाजन यांच्या आजीच्या उत्तरकार्यामुळे एक सामाजिक कार्य त्यांच्या हातातून व्हावे, म्हणून हे शैक्षणिक साहित्यचे वाटप करण्यात आले  आहे, असे मत या वेळी बोलतांना महाजन सरांनी  व्यक्त केले. 
         या उपक्रमामुळे आमच्या शाळेतील विदयार्थ्यांना खूप मोठी मदत होईल. समाजातील लोकांना सुध्दा महाजन सरासारखा उपक्रम राबवले तर एक हि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे मत शाळेचे मुखाध्यापक संजय  कोळी यांनी व्यक्त केले. यावेळी मेघा महाजन, निंबा महाजन, शाळेतील शिक्षक
कमलेश बोरसे, जयश्री भदाणे, सिमा बोरसे इत्यादी उपस्थित होते, सरांच्या  या उपक्रमांची पंचकोशीतील लोकांनी कौतुक व अभिनंदन केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.