उरण (सुनिल ठाकूर ).
खोपटा उबाठा गटाचे शाखाप्रमुख हेमंत पाटील तसेच त्यांच्यासोबत उबाठा गटाचे कार्यकर्ते दत्तात्रेय पाटील, दिनेश पाटील, दत्ताराम पाटील, जितेंद्र पाटील, धीरज पाटील, किरण पाटील, राजेश मुंबईकर, अमर शिंदे यांनी शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , आमदार मा. श्री.महेंद्र थोरवे साहेब आणि जिल्हाप्रमुख मा. श्री.संतोष शेठ भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नुकताच बाळासाहेब भवन येथे पक्ष प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे उरण तालुका संघटक चंद्रकांत पाटील,
अनिकेत पाटील (आवरा पंचायत समिती विभाग प्रमुख), विकास पाटील, (वेश्वी शाखा प्रमुख ),रोहन कडू , सुनील घरत,.आदी उपस्थित होते.