उरण (सुनिल ठाकूर ). आपल्या कोकणातील खाद्य संस्कृती चे जतन व्हावे व पाक कलेत तरबेज असणाऱ्या सुगरणी च्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आदरणीय खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त उरण राष्ट्रवादी (अजित दादा गट ) पक्षा तर्फे रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी उरण तालुका स्तरीय भव्य पाक कला स्पर्धा 2024 चे आयोजन उरण येथील हॉटेल राम रतन येथे करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत सौ. पूजा विशाल पाटील (कंठवली ) हिच्या फिश थाळी /कोलंबी पाक कले साठी प्रथम क्रमांकाचे रेफ्रिजरेटर, बक्षीस देण्यात आले. तर सौ. भारती समाधान कटेकर (धुतुम ) हिच्या सांदन पाक कले साठी द्वितीय क्रमांकाचे मायक्रोवेव्ह ओहन तर स्मुती आहिरे (उरण ) हिच्या व्हेज, चिकन बुर्जी /सॅन्डविच पाक कले साठी तृतीय क्रमांकाचे मिक्सर देण्यात आले तर सौ. सविता मढवी ( चिर्ले ) हिच्या ऋषी ची भाजी पाक कले साठी तर फरीन मुकरी (उरण) हिच्या पेलवी पाक कले साठी उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धे साठी 60 महिलानी सहभाग नोंदविला होता.यावेळी प्रत्येक सहभागी स्पर्धेकास आकर्षक भेट वस्तू देण्यात आले. यावेळी स्पर्धे चे परीक्षक म्हनुन सौ.आसावरी ताई ओक व सौ. वर्षा ताई पाटील यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धे साठी सौ.उमाताई मुंढे ( रायगड जिल्हा महिला अध्यक्षा, माजी महिला व बालकल्याण सभापती तथा विद्यमान सरपंच वासंबे- रसायनी ) , सौ.कुंदाताई ठाकूर ( उरण तालुका महिला अध्यक्षा तथा माजी जि.प.सदस्या ),सायमा ताई शेख ( उरण शहर महिला, अध्यक्षा ) , श्री वैजनाथ ठाकूर (उरण विधानसभा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ),तालुकाध्यक्ष- परिक्षित ठाकूर, तुषार ठाकूर ( माजी नगरसेवक ),समत भोंगले ( युवक अध्यक्ष ) , त्रिकाळ पाटील ( घारापुरी गाव अध्यक्ष) ,
आकाश घरत ( सामाजिक कार्यकर्ता ) विवेक केणी- (गायक,) विशाल पाटील, अरुण ठाकूर, साहिल ठाकूर, संदेश भाई ( पंचायत समिती अध्यक्ष ) आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन स्थाम ठाकूर यांनी केले तर स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महिला भगिनींनी उत्तम प्रतिसाद दिल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट ) उरण यांच्या तर्फे आभार मानण्यात आले.