उरण (सुनिल ठाकूर ). बेलपूर येथील सेक्टर 15 साई विहार येथे सुवर्णा कासवलेकर, सदानंद हजारें, अभिषेक हजारें, जय कासवलेकर, ययाती हजारे, या मराठी माणसांनी एकत्र येऊन नवी मुंबई सी प्राईड रेस्टॉरंट तयार केले. नुकताच या रेस्टोरंट चे उदघाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमदार मंदा ताई म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भीमसेन माळी, जयेंद्र खुणे, पत्रकार गणेश कोळी, मिथुन पाटील, अमित पाटील, अरुण पेदे, ए सी पी साळवे, उद्योजक दुधे, नाईक, सावळेकर आदी उपस्थित होते, यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी फोन वरुन शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोरंजन साठी गायक मनोहर फुंडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमा चे शानदार निवेदन जयदास ठाकूर यांनी केले होते.