-->
आपला महाराष्ट्र 24

साई मंदिर साई नगर वहाळ चा 12 वा वर्धापन दिन मोठ्या उत्सहात विविध कार्यक्रमांनी साजरा.


उरण (सुनिल ठाकूर ). मंगळवार दिनांक 9/4/2024  गुढीपाडव्या निमित्त साई देवस्थान साई नगर वहाळ साई मंदिराचा 12 वा वर्धापन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 8/4/2024  सकाळी 6 वाजतां काकड आरती,6.30वाजता बाबां  चे मंगल स्नान स्नेहल एकनाथ ठाकूर (चिर्ले यांच्या हस्ते ),सकाळी 8 वाजतां महा आरती, व साई बाबा आष्टोतर शतनामावली जप, रात्रौ 8 वाजता साई चरित्र ग्रंथ व अखंड पारायण प्रारंभ. 
दिनांक 9/4/2024 गुढीपाडवा सकाळी 6.30 वाजता बाबां चे मंगल स्नान मंजित काथोर पाटील यांच्या हस्ते. सकाळी 8 वाजता महा आरती व साई बाबा आष्टोतर शतनामावली जप सकाळी 10 ते 12 लक्ष्मण महाराज प्रासादिक भजन मंडळ गव्हाण यांचे भजन पार पडले.व पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णा हुती पुतळ्या चे अनावरण सोहळा पार पडला.दुपारी 12.30.महा प्रसाद अन्नदाते स्व. धनाजी काथोर पाटील यांच्या स्मरणार्थ. सायंकाळी 4 ते 6 भेरवी देवी आध्यात्मिक सेवा भावी हरिपाठ मंडळ केलवणे यांचे हरिपाठ. सायंकाळी 6 धूप आरती, सायंकाळी 7 महाप्रसाद अन्नदाते स्व. धनाजी काथोर पाटील यांच्या स्मरणार्थ. रात्रौ 8वाजतां  बाबां च्या पालखी सोहळ्या ने कार्यक्रमाची सांगता झाली. या पालखी सोबत दिंडी भजन रत्नेश्वरी साई प्रेरणा भजन मंडळ जसखार स्व. वामन बुवा कडू यांचे भजन मंडळ सामील होते.
 या पालखी सोहळ्या प्रसंगी आर. टी. ओ. चे विद्यासागरहिरमुखे, अन्न व औषध महाराष्ट्र सचिव संदीप पतंगे,माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, नारायण शेठ घरत, काशिनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. पार्वती ताई पाटील साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, बाळाराम पाटील,शेकाप महिला आघाडी च्या माधुरी गोसावी,जगन शेठ पाटील, अनंत पाटील, मो. का. मढवी, शिरीष कडू, ह. भ. प.रामकृष्ण महाराज, सुदिन पाटील, सुशील पाटील, धनंजय घरत, माजी सरपंच अरुण दापोलकर,सुयोग खरे,तैमूर पाटील, विश्वास पाटील, श्रीकांत मुंबई कर,निवेदक हरीश केणी,अजय दापोलकर,आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.