-->
आपला महाराष्ट्र 24

वीर वाजेकर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांची शांतीवन वृद्धाश्रमास मदत.


उरण (सुनिल ठाकूर ).
( उरण, फुंडे ) रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कॉलेजच्या ग्रामीण विकास विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी पनवेल येथील शांतिवन वृद्धाश्रमास व रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमास  दि.०४ ऑक्टोबर रोजी भेट दिली. तसेच तिथल्या वृद्धांच्या समस्या जाणून घेऊन, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यार्थ्यांनी, थंडीपासून बचाव होण्यासाठी वृध्दांना ८० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन ग्रामीण विकास विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. विलास महाले यांनी केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. देवेंद्र कांबळे, माजी विद्यार्थी कुंदन परदेशी, धीरज पाटील, संदेश ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार यांनी मार्गदर्शन केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.