-->
आपला महाराष्ट्र 24

समाज कल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातूनभिवंडी तालुक्यातील खानिवली गाव व परिसरासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा



उरण (सुनिल ठाकूर ). 

भिवंडी तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य समजली जाणारी समाज कल्याण न्यास या संस्थेच्या वतीने खानिवली ब परिसरातील गावांना
आरोग्य सेवेचा मोफत - लाभ मिळावा या उद्देशाने समाज कल्याण न्यास या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर  सोन्या काशिनाथ पाटील यांनी निस्वार्थ भावनेने रुग्णवाहिका भेट देऊन तिचे लोकार्पण मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आले. खानिवली हाभाग  भिवंडी तालुक्यातील ग्रामीणभाग  असल्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना इमर्जन्सी (अत्यावश्यक सेवा) तातडीची मदत इमर्जन्सी असले तर उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जाताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. ही बाब खानिवली येथील नागरिकांनी समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या गोष्टीची तातडीने दखल घेऊन सोन्या पाटील यांनी आपल्या स्वखर्चाने खानिवली परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिका भेट दिली असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री विश्वास थळे यांनी यावेळी  सांगितले. सदर लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख विश्वास थळे यांच्या हस्ते, रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.