-->
आपला महाराष्ट्र 24

मंगेश वाकडीकर यांच्या प्रयत्नाने अचानक मित्र मंडळ तर्फे शिरढोणपाडा शाळेला पाणी फिल्टर मशीन भेट


उरण (सुनिल ठाकूर ).
दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी शिरढोण केंद्राची माहे सप्टेंबर ची शिक्षण परिषद रा.जि.प.शाळा शिरढोणपाडा येथे पार पडली. 
  शिक्षण परिषदेसाठी आलेल्या  सर्व शिक्षकांना शाळा शिरढोणपाडा आणि शाळा व्यवस्थापन समिती तर्फे छान नियोजन केले होते.
   शिरढोण ग्रामपंचायतच्या उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्र प्रमुख मा.श्री.विनोद ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण परिषदेचे ऊद्घाटन झाले.
या प्रसंगी मा.श्री.मंगेशजी वाकडीकर (अध्यक्ष केळवणे जि.प., अध्यक्ष अचानक मित्र मंडळ शिरढोणपाडा, अध्यक्ष रायगड प्रिमियर लीग) यांच्या प्रयत्नाने शिरढोणपाडा शाळेत पिण्याच्या पाण्याचे फिल्टर अचानक मित्र मंडळा तर्फे भेट देण्यात आले, फिल्टरचे औपचारिक उद्घाटन मा.श्री.सुशांत वेदक (सचिव अचानक मित्र मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष) यांचे हस्ते करण्यात आहे.
ह्या प्रसंगी सौ.मेघा म्हात्रे (मुख्याध्यापक), सौ.नुतन पाटील, श्री.संतोष रावते, सौ.उज्वला राजगे. आणि शाळा व्यवस्थापन समितीने विशेष मेहनत घेतली.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.