उरण (सुनील ठाकूर ).
:- रविवार दि १० सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, दहिसर (प.) येथे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दहिसर शाखा व कवितासागर प्रकाशन , जयसिंगपूर, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कवी बाळासाहेब झोडगे यांच्या मनाविष्कार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
ज्येष्ठ कवी व विचारवंत मा. ज. वि. पवार यांच्या हस्ते व सद्धम्म पत्रिकेचे संपादक मा. प्रा. आनंद देवडेकर, ज्येष्ठ गझलकार भागवत बनसोडे व महेंद्र साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .