-->
आपला महाराष्ट्र 24

शिवराजे मित्र मंडळ भव्य नाईट दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.


उरण (सुनिल ठाकूर ).
जे. ऐन. पी.टी.टाऊनशीप मध्ये  शिवराजे  मित्र मंडळ जेएनपी.टी.(वर्षे पंधरा)  दहीहंडी चे आयोजन करण्यात आले .सालाबादप्रमाणे श्री प्रदीप ठाकूर (शिवसेना उप तालुका प्रमुख तथा माजी सरपंच चिरले),श्री रवी घरत (कामगार नेते)यांच्या हस्ते दहीहंडी ची आरती आणि श्रीफळ फोडण्यात आला 
प्रारंभी गणेश स्तवन करीत DDC अकॅडमी चे बहारदार नृत्याने सादरीकरण झाले. श्री प्रदीप ठाकूर (उप तालुका प्रमुख) श्री दिनेश पाटील (जे एन पी.टी. ट्रस्टी तथा माजी जिल्हा प्रमुख ) श्री रवी घरत (कामगार नेते )द्रोणागिरी शहर अध्यक्ष जगजिवन भोईर, आई इन्फ्रा चे नरसू पाटील सर, पानजे सरपंच लखपती पाटील, अ‍ॅड.रत्नदीप पाटील यांनी सहकार्य,उपस्थिती दाखवली. दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना DDC अकॅडमी, पनवेलकर ग्रुप, माझ्या नावाने बांधला बंगला फेम सिद्धी तुरे व सूर नवा ध्यास नवा फेम नेहा केणी हिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नेहा केणी हिने सादर केलेल्या भारत का बच्चा, बच्चा जय जय श्रीराम बोलेगा,गाण्याला प्रेक्षकांनी लाक्षणिक दाद दिली. 
5,6,7,असे गोविंदाचे थर लावत गोविंदा पथकांनी दहीहंडीत सलामी दिली. करंजा येथील गोविंदा पथकांनी   शिव राजे मित्र मंडळ जे.एन पी.टी ची दहीहंडीफोडली
.मंडळाची दहीहंडी यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सदस्य कुणाल घरत,विश्वजीत घरत, केतन घरत, संदेश ठाकूर ,.करण पाटील, स्वप्निल साळुंखे, मनीष पाटील, नवनीत पाटील, शेखर घरत, अक्षय घरत, सुमित ठाकुर, यश राज ठाकुर, अंकित केळुसकर, अमर पाटील, निखिल सोनकांबळे, संनीत म्हात्रे, मयूर भोईर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम व्यवस्थित तडीस नेण्यासाठी केलेल्या सहकार्य बद्दल उपस्थित सर्वाचे व न्हावा शेवा  पोलीस ,नवी मुंबई पोलीस यांचे आभार श्री प्रदीप ठाकूर यांनी मानले. 
चिरनेरचे सुपुत्र राजेंद्र भगत यांनी उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.