उरण (सुनिल ठाकूर ).
जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण मागणी पाठींबा देण्या साठी तसेच तेथे झालेल्या अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी उलवे येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठ्यांनी मुक मोर्चा काढला.
या वेळी शेकडो समाज बांधव तसेच अन्य समाज संघटना यानी जाहीर पाठिंबा देत मोर्च्यात सामील झाले होते. यामध्ये नगरसेवक गणेश कडू, मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, नरेंद्र देशमुख, आकाश देशमुख, सचिन राजे येरूनकर, अरूण सावंत, पी. डी. देशमुख, व असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते