उरण (सुनील ठाकूर ).विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्री साई देवस्थान वहाळ तर्फे साई सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते .
यावेळेस उत्कृष्ठ गायक रवी नाईक यांची मुलगी कु .सोनल रवी नाईक यांना श्री साई देवस्थान साई नगर वहाळ तर्फे " साई सन्मान 2023" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी साई देवस्थान वहाळ चे अध्यक्ष रवीशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्यां सौ. पार्वती ताई पाटील, विश्वस्त जगन शेठ पाटील, अनंत पाटील, मो. का. मढवी,कला सागर चे निर्माता श्रीकांत मुंबईकर, नगरसेविका सौ. वर्षा नाईक, गायक रवी नाईक, पी. सी. म्हात्रे, उत्तम म्हात्रे, नरेश पाटील, एकनाथ ठाकूर, विश्वास पाटील आदी सह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.