पालघर दि २६ (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील महिलांना स्तनांच्या कर्करोगाचे निदान त्वरित व्हावे व जिल्ह्यातच उपचार मिळावे यासाठी कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्सने आपल्या सामाजिक दायित्व उपक्रम अंतर्गत आज स्वर्गीय रतीलाल देवीजी चौहान चॅरिटेबल ट्रस्टला मोबाइल मेडिकल व्हॅन पुरवत असल्याची घोषणा केली. स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी ही मोबाइल मेडिकल व्हॅन खास तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये एआय बेस्ड थर्मालिटिक्स स्क्रीनिंग मशिन्स बसवण्यात आले असून त्यामुळे पालघर जिल्हा व आसपासच्या परिसरातील वंचित स्त्रियांना मदत होईल. या मोबाइल मेडिकल व्हॅनचे उद्घाटन डॉ. उज्ज्वला काळे, महपौर, पालघर जिल्हा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल. यावेळी डॉ. राजेंद्र चौहान, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, एलआरडीसीसीटी आणि कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. मनिष रांगणेकर, लिमिटेड उपस्थित होते
स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून या उपक्रमामुळे स्त्रियांमध्ये त्याचे वेळेवर निदान व उपचार होण्यास मदत होईल. कोटक लाइफच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत एलआरडीसीसीटीद्वारे नो टच तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. हे तंत्रज्ञान थर्मालिटिक्स मशिनचा वापर करते, ज्यामध्ये कम्प्युटरवर चालणाऱ्या डायग्नॉस्टिक इंजिनच्या मदतीने थर्मल व्हेरिएशन्सवरून स्तनातील गाढ शोधली जाते. या व्हॅनमधील कर्मचारीवर्गात पूर्णपणे स्त्रियांचा समावेश असून टेस्टदरम्यान स्त्रियांना सुरक्षित वाटेल याची काळजी घेतली जाईल. त्याशिवाय रेडिओलॉजिस्टच्या बाह्य सेवेचीही मदत घेतली जाणार आहे. निदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एलआरडीसीसीटीतर्फे रुग्णांना गरजेनुसार अधिक माहिती व उपचारांसाठी तज्ज्ञांची शिफारस केली जाईल अशी माहिती कोटक महिंद्र लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश सुब्रह्मण्यम यांनी दिली.