-->
आपला महाराष्ट्र 24

समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून मा. कोकण म्हाडा सभापती श्री बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.



उरण.(सुनिल ठाकूर ) :- मा. कोकण म्हाडा सभापती श्री बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस पनवेल येथे प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृध्द आश्रमात भेट वस्तू वाटप अनाथ आश्रमात भेट वाटप तसेच खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल क्षेत्रात मंदिर,बौद्ध विहार, गुरुद्वारा अशा धार्मिक स्थळांना भेट देऊन या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा कुंड्याचे वाटप केले व वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छत्रींचे, रिक्षा चालकांना रेनकोट आणि गरीब व गरजू नागरिकांना तसेच आशा वर्कर यांना धान्य किटचे वाटप मा कोकण म्हाडा सभापती श्री बाळासाहेब पाटील, भाजप प्रदेश सरचिटणीस श्री. विक्रांत पाटील तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते या सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना सर्व समाज घटकांचा विचार करून प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी विशेष कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामुळे पनवेल व रायगड जिल्ह्यातील नागरिक आपुलकीने वाढदिवसाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात.
या कार्यक्रमानिमित्त बोलताना भाजप प्रदेश सरचिटणीस श्री. विक्रांत पाटील म्हणाले की प्रामाणिकता आणि निष्ठेची परिभाषा काय असू शकते हे ज्यांनी दाखवून दिले असे व्यक्तिमत्व म्हणजे श्री बाळासाहेबजी पाटील तसेच भाजप पक्षाने जो अंत्योदयाचा विचार दिला आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास होत नाही तो पर्यंत कार्य करत राहायचे हे ज्यांच्या
कार्यातून नेहमीच शिकायला भेटले त्या व्यक्तिमत्त्वाचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत अशी भावना यावेळी व्यक्त केली.
तसेच यावेळी बोलताना मा. कोकण म्हाडा सभापती श्री. बाळासाहेब पाटील म्हणाले की माझा वाढदिवस हा समाजाच्या आनंदातच आहे त्यामुळे समाज उपयोगी उपक्रम जास्तीत जास्त घेऊन पुढील काळामध्ये जनतेची सेवा हाच संकल्प करत आहे.
या कार्यक्रमाला पनेवल व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थिती लावली व प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या अनमोल अशा शुभेच्छा श्री बाळासाहेब पाटील यांना दिल्या.
याप्रसंगी शेकाप नेते मा. आमदार बाळारामजी पाटील, नगरसेवक विकास घरत, किरण पाटील, डॉ. अरुण भगत, रवी पाटील, निलेश बाविस्कर, अभिमन्यू पाटील, वासुदेव पाटील, ब्रिजेश पटेल, सिताताई पाटील, दर्शना भोईर, राजू शर्मा, कमल कोठारी, निर्दोष केणी, भीमसेन माळी, नावडेकर इकबाल यांच्यासह अनेक वरिष्ठ पक्ष नेतृत्वाने सकाळपासूनच फोन करून बाळासाहेब पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, अनेक पक्षांचे नेते, हितचिंतक नागरिक यांनी प्रत्यक्ष भेटघेऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य प्रशांत कदम समीर कदम, प्रदीप देशमुख, तानाजी खंडागळे सुभाष कदम, देविदास खेडकर, हरिदास वणवे, विजय उलवेकर, सुनील सिन्हा, राजन पिल्ले तसेच अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.